आस्था हॉस्पीटल विक्रोळी व क्रांती बॉईज तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
आस्था हॉस्पिटल, विक्रोळी व सौजन्याने, क्रांती बॉईज सूर्य नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते .
क्रांती बॉईज तर्फे श्री महेश पाटील यांच्या पुढाकाराने विभागातील गरीब व गरजू रुग्णांच्या आरोग्या करता सदर आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते .
प्रसिद्ध हृदयरोग व डायबिटीस तज्ञ डॉ . अनन्या मुखर्जी जनरल सर्जन डॉ .सोनल परेलकर
नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तिरुपती कदम व आस्था हॉस्पिटल विक्रोळी स्टाफ यांनी सर्व पेशंटची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले . शिबिरात नेत्र तपासणी , ब्लड शुगर तपासणी व विविध आजारा संदर्भातआरोग्य तपासणी अशा विविध सुविधा जनतेला मोफत उपलब्ध करून दिल्या .
आम्ही वेळोवेळी विभागातील गरीब व गरजू रुग्णांच्या आरोग्य संदर्भात आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांना निशुल्क आरोग्य सल्ले व मोफत औषध उपलब्ध करून देत आहोत असे आस्था हॉस्पिटल चे संस्थापक अध्यक्ष डॉ . विठ्ठल देशमुख म्हणाले .
सदर कार्यक्रमात विभागातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकासहित तरुण व महिलां वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .



Post a Comment