पंतप्रधान मा .नरेंद्र मोदीजी यांचे स्वागत करण्याचा बहुमान नगरसेवक राजेशदादा सोनावळे यांना बुधवार दिनांक १ ८ फेब्रु - २०२६ रोजी लाभला . ' आज इंडिया–फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन-२०२६’ या सोहळ्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले देशाचे मान . पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे आज मुंबई विमानतळावर स्वागत करण्याचा सन्मान प्रभाग क्र. ११९ चे लाडके नगरसेवक मा. राजेशदादा सोनावळे यांना लाभला. यावेळी महापालिकेतील अन्य सहकाऱ्यांसमवेत मा. राजेशदादा सोनावळे यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अत्यंत आदराने, आत्मीयतेने आणि अभिमानाने स्वागत केले. या अनुभवाबद्दल मा. राजेशदादा सोनावळे म्हणाले की, "याप्रसंगी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी झालेली भेट ही माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्या उपस्थितीत जाणवलेली ऊर्जा, त्यांचे कणखर नेतृत्व आणि विकासासाठीची बांधिलकी हे सर्व प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील." 'इंडिया–फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन-२०२६’ अंतर्गत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष श्री. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांची बैठक ही आपल्या देशाच्या तंत्रज्ञानात्मक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अशा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता आलं, यासाठी मा. राजेशदादा सोनावळे यांनी त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. मा. राजेशदादा सोनावळे पुढे म्हणाले की, "प्रभाग क्र. ११९ च्या मायबाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मला हा सन्मान लाभला. त्यांच्या प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वादामुळेच मी आज या क्षणाचा साक्षीदार ठरलो, याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन. आजच्या या अनुभवाने आपल्या प्रभाग क्र. ११९ च्या विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आणखी जोमाने, अधिक वेगाने आणि अधिक जबाबदारीने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे."

Post a Comment