संभाजीनगरचे संपर्क प्रमुख श्री. विलास पारकर म्हणाले की मी लवकरच १० दिवसांसाठी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामी असणार आहे. या काळात विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल. या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी केली जाईल. पक्षातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन ही कामे केली जाणार आहेत. श्री. विलास पारकर एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. दूरदृष्टीकोन, संघटनात्मक पकड व शासकिय कामांची जाण व जनतेच्या संपर्कात असल्याने विभागात त्यांचा विशेष प्रभाव आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे नुकतीच संपर्क प्रमुख पदी अनेक नेत्यांची निवड करण्यात आली. विक्रोळीतील एकनिष्ठ शिवसैनिक श्री. विलास पारकर यांच्यावर मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी नगर संपर्क प्रमुख अशी मोठी जबाबदारी नुकतीच सोपविली. शिवसेनेत संपर्कप्रमुख पदाच्या माध्यमातून पक्षाचे अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय, रणनीती आणि तळागाळातील संघटनात्मक बांधणी केली जात असे. मात्र, मधल्या काळात या पदाचे महत्त्व काहीसे कमी झाले होते. आत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत या पदाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले असून, याच जुन्या 'फॉर्म्युला'च्या माध्यमातून पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा ते प्रयत्नात आहेत. पक्षाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी सपर्कप्रमुख नेमले आहेत.
शिवसेनेने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरात संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त संपर्कप्रमुख म्हणून विलास पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते लवकरच सलग १० दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींना मोठा वेग येणार आहे.

Post a Comment