शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत रुग्णालयात असून तेजस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते.
तेजस ठाकरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून स्वतः उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. तेजस ठाकरे यांच्यावर बुधवारपासून करण्यात येत असलेल्या उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते.
तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र आहेत. थोरले बंधू आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असले तरी तेजस ठाकरे यांनी अद्यापही वन्यजीव संशोधन आणि दुर्मिळ प्रजातींच्या शोधात अधिक रस दाखवला आहे. पश्चिम घाटात वन्यजीव संशोधनादरम्यान त्यांनी पाली, खेकडे, सरडे तसेच दुर्मिळ माशाच्या प्रजाती शोधल्या आहेत. अंबोली येथील संशोधनादरम्यान त्यांनी शिस्तुरा हिरण्यकेशी ही माशाची दुर्मिळ प्रजाती शोधली होती. राजकारणापेक्षा जंगल सफारीत अधिक रस असल्याचे मत तेजस ठाकरे यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केले आहे.

Post a Comment