⚡ ब्रेकिंग News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती मिरवणूक समितीच्या अध्यक्षपदी श्री धीरज कांबळे यांची निवड


 विक्रोळी टागोर नगर विभागातील  फुले - शाहू -आंबेडकर  विचारांचे खंदे समर्थक तसेच प्रसिद्ध आंदोलक श्री. धीरज कांबळे हे विक्रोळी विभागात मागील अनेक वर्षांपासून विभागातील अन्याय पीडीत समाजासाठी लढा देत आहेत . .न्यायापासून वंचित समाजाला तसेच अन्यायग्रस्त पिडितांना त्यांच्यातर्फे वेळोवेळी सहाय्य केले जात असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा त्यांनी यशस्वी आंदोलने केली आहेत . 

विक्रोळी टागोर नगर गृप नं . ३ जेतवन बुद्ध विहार आयोजित करण्यात येणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती मिरवणूक समितीच्या अध्यक्षपदी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील  कृतिशील कार्यकर्ते धीरज कांबळे यांची दुसऱ्यांदा झालेली निवड ही अत्यंत गौरवास्पद व प्रेरणादायी आहे.

        धीरज कांबळे हे समाजकार्यात सातत्याने सक्रिय राहून बहुजन समाजाच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणारे, संघर्षशील आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि संघटन कौशल्यामुळे ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, ही त्यांच्या कार्याची पावती आहे.

या निवडीमुळे मिरवणुकीला नवी दिशा, उत्साह आणि शिस्त लाभेल, याबाबत पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही जयंती मिरवणूक अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरेल, अशी आंबडकरी जनते तर्फे अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

सदर वृत कळताच विविध समाज बांधव  , मंडळे  व संस्था यांच्या तर्फे धिरज कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे .


 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...