⚡ ब्रेकिंग News

मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना


मुंबई: आज राज्यसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले, यामध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आणि शिवसेना पक्षाचा एक तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी (Sharad Pawar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित न राहता अशा पद्धतीने शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली

पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग १९६८ साली सुप्रीम कोर्टात निवाडा झाला होता. यावेळीआरोग्यासह कुठल्या ही वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर संविधानाच्या कलम ८४ अ प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करण अनिवार्य असते. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधीमंडळात येऊन निवडणूक अधिकारी यांना सादर केला. पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष, खबरदारीचा उपाय म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर या तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करु शकतो. महाराष्ट्रात शरद पवार यांनी पहिल्यांदाच असा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...