⚡ ब्रेकिंग News

मनपा निवडणूकित तिकीट कापले - आता उद्धव ठाकरेंनी दिली मोठी संधी; गिफ्ट मिळताच म्हणाल्या,...


 

नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी अनेकांची उमेदवारी कापावी लागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या मंडळींची संख्या मोठी होती. मात्र, त्यापैकी शेवटच्या क्षणी वडाळा येथील प्रभाग क्रमांक 178 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेल्या माधुरी विश्वासराव-मांजरेकर या उमेदवारी कापल्यानंतर सर्वांसमोरच ढसाढसा रडलेल्या होत्या.पण दीड महिन्यातच उद्धव ठाकरेंकडून त्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. त्यामुळे त्या भावुक झाल्या होत्या. त्यांची आता मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागलेली आहे. त्यानंतर माधुरी यांनी 'निष्ठेचं फळ' अशी एका वाक्यातच प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील तीन जणांच्या नावावर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक ही तीन नावे फायनल करण्यात आली आहेत. 21 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांच्यामार्फत 21 तारखेला औपचारिक घोषणा होईल. त्यानंतर साईनाथ दुर्गे, माधुरी विश्वासराव - मांजरेकर, कैलास पाठक यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होईल. या तिन्ही नावांवर मातोश्री बंगल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...