⚡ ब्रेकिंग News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात, काही मोठे घडणार काय ?

 


आता या भागात शेतकऱ्यांना बारामाही शेती करता आली पाहिजे मग हरभरा असेल गहू असेल किंवा इतर पिक असेल इथे ऊसही चांगल्या प्रकारचा येतो. ऊसाची वाढ चांगली होत आहे. भाजीपालाही मोठ्या प्रमाणात लावला आहे. बटाटे, कांदे, हिरवी मिरची आणि इतर हिरवा पालीभाजा येथे येतो, तोही चांगल्या प्रकारे.शेतांमध्ये अधिक वेळ घालून नवनवीन पिके कशी घेता येतील, यावर त्यांचा अधिक भर असतो. राज्यातील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नंबर दोनचा पक्ष ठरला. भाजपासोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुका लढल्या आणि थेट अनेक महापालिकांवर सत्ता आणली

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेले आहेत. काही महत्वाच्या घडामोडी घडण्यापूर्वी कायमच एकनाथ शिंदे दरे गावात जातात. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावात गेले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टे केले की, मी नाराज होऊन दरे गावात गेलो नव्हतो. यादरम्यानच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दरे गावात पोहोचले होते दोन दिवस मुक्कामी होते. दरे गावातून बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपण गेल्यावर्षी सफरचंदाची बाग लावली होती. यावर्षी त्याला सफरचंद लागली आहेत. यासोबतच काजू, आवळा, अवकाडो अशी नवीन नवीन झाडे आपण लावली आहेत. यासोबतच ब्रोकलीचीही लागवड केली आहे. या भागात कुठल्या कुठल्या पद्धतीची झाडे येऊ शकतात आणि त्याची वाढ होऊ शकते हे पाहणे सुरू आहे. कारण इकडे भात आणि नाचणी याशिवाय दुसरे कोणतेही पिक नव्हते. .

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...