⚡ ब्रेकिंग News

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली विनंती

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली खास विनंती महापौर झाल्यानंतर रितू तावडे विविध निर्णय घेताना दिसत आहेत

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली खास विनंती . भारतीय जनता पार्टीने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवले. सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई पालिकेत भाजपने रितू तावडे यांच्या माध्यमातून पहिली महिला महापौर बसवली. मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच भाजपाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात महापौर रितू तावडे यांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेत भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना खास विनंती केली आहे. मुंबईची महापौर म्हणून मला मिळणारे मानधन मी महापौर निधीस देत असून माझ्यासहीत इतर सर्व नगरसेवकांनी, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर निधीस आर्थिक मदत करुन गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेमध्ये खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले .

मुंबईकरांना केली हात जोडून विनंती

मुंबईच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईकर नागरिक मोठया प्रमाणात भेटण्यासाठी शाल व पुष्पगुच्छ घेऊन येत असून याऐवजी नागरिकांनी दुर्धर आजारातील गरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी महापौर निधीस सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईची महापौर म्हणून मुंबईकर नागरिकांना करीत आहे.  यासाठी क्यू आर कोड ची व्यवस्था करण्यात येत असून नागरिका या क्यू आर कोड द्वारे आपली आर्थिक मदत महापौर निधीस देऊ शकतात. महापौर कार्यालयाच्या दर्शनीभागावर हे क्यूआर कोड लावण्यात येणार असून नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...