⚡ ब्रेकिंग News

नरेंद्र मोदींचे स्वागत आणि तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार;

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासह मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या उपपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी, इमॅन्युएल मॅक्रोन कालच मुंबईत दाखल झाले असून राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लोकभवन येथे मॅक्रोन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र, पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असल्याने भाजप नेत्यांनाही मोदींच्या भेटीची ओढ असते, मोदींच्या स्वागताची संधी आपल्याला मिळावी, हे अनेकांचे स्वप्न असते. नुकत्याच दहिसरच्या वार्डातून नगरसेवक बनलेल्यातेजस्विनी घोसाळकर

तेजस्विनी घोसाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांना दहिसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारीही देण्यात आली अन् निकलात त्यांनी बाजी मारली. त्यामुळे, मुंबई महापालिकेत त्या दुसऱ्यांदा नगरसेवक बनल्या आहेत. त्याचदरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोदींच्या स्वागताची संधी मिळाल्याचं त्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं. 


ज्यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची सुवर्णसंधी आज मला लाभली. ही माझ्यासाठी केवळ औपचारिक भेट नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी प्रेरणादायी ऊर्जा आहे, अशा शब्दात त्यांनी आजच्या भेटीचं वर्णन केलं. आज मोदींजींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी अत्यंत आदर, आत्मीयता आणि अभिमानाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत जाणवलेली ऊर्जा, राष्ट्रासाठी झटणाऱ्या नेतृत्वाची जिद्द आणि विकासासाठीची बांधिलकी हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. या संधीसाठी महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार, असे तेजस्विनी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...