राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला असून कामालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने देखील त्या सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. पुढील आठवड्यातच राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवार पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. त्यातच, राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधात सत्ता स्थापन करत असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil tatkare) यांची भेट घेऊन चर्चा केली.
सीबीआय चौकशीबाबत अमित शहांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना सीबीआय चौकशी करण्याबाबत तसेच अपघाताची नेमकी कारणे समोर आणण्याबाबत विनंती करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Post a Comment