⚡ ब्रेकिंग News

एनसीएमसी कार्ड’ असेल तरच एसटी तिकीटात मिळणार सवलत; लवकरच नोंदणी मोहीम सुरू करणार

 मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे. यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळ निदर्शनास आले होते. आता योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा, तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...