दि. १२ फेब्रुवारी २०२६
स्थळ : फ्रेंड्स बँक्वेट हॉल
विषय : नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ता सन्मान सोहळा'
फ्रेंड्स बँक्वेट हॉल मध्ये आमदार मनिषाताई चौधरी यांनी आयोजित केलेल्या दहिसर विधानसभेतील 'नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ता सन्मान सोहळा' मुंबई भाजपाचे अध्यक्ष मा. श्री. अमित साटम जी, मा. खासदार गोपाळ शेट्टी , आमदार मनिषाताई चौधरी आणि जिल्हा अध्यक्ष , नगरसेवक दीपक बाळा तावडे यांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक तथा गटनेते श्री. गणेश खणखर, नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष श्री. दीपक (बाळा) तावडे, नगरसेवक श्रीमती तेजस्वी अभिषेक घोसाळकर, नगरसेवक श्री. जितेंद्र पटेल, नगरसेवक सौ. योगिता पाटील , नगरसेवक श्री. प्रकाश दरेकर यांचा सत्कार करण्यात आला
तसेच यावेळी माझ्या बरोबर मुंबई महानगरपालिकेत संपूर्ण दहिसर विधानसभेत महायुतीचा भगवा फडकावणासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या दहिसर विधान सभेतील मंडळ अध्यक्ष, मंडळ महामंत्री, वॉर्ड अध्यक्ष, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा, युवा मोर्चा अध्यक्ष, मंडळ व वॉर्ड पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी ज्येष्ठ नेते जे.पी. मिश्रा, ज्येष्ठ नेते श्रीकांत पांडे,पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, मध्य मंडळ अध्यक्ष पूनम पांडे, पूर्व मंडळ अध्यक्ष अमित सिंग, तसेच महिला व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याची सांगता सर्वांच्या स्नेहभोजनाने झाली.
Post a Comment