फक्त सकाळीच प्यावं की दिवसभर कोमट पाणी पिणं चांगलं? पाहा आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:40 IST
Lukewarm Water Drinking Tips : अनेकांना प्रश्न पडतो की, फक्त सकाळीच कोमट पाणी प्यावं का किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायलं तर काय होईल? हेच आपण समजून घेऊया.
featured-img
फक्त सकाळीच प्यावं की दिवसभर कोमट पाणी पिणं चांगलं? पाहा आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात..
googleNews
Lukewarm Water Drinking Tips : वजन कमी करायचं असो वा इम्यूनिटी बूस्ट करायची असो किंवा मग पचन तंत्र मजबूत करायचं असो अनेक हेल्थ एक्सपर्ट सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. लोकही अनेक फायद्यांचा विचार करून सकाळी न विसरता उपाशीपोटी कोमट पाणी पितात. याचे भरपूर फायदेही मिळतात. पण साधारपणे पाहिलं तर सगळेच हेल्थ एक्सपर्ट सकाळीच उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या बोलण्यात जास्तकरून असं आढळत नाही की, दिवसभर कोमट पाणी प्यावं. मग अशात अनेकांना प्रश्न पडतो की, फक्त सकाळीच कोमट पाणी प्यावं का किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायलं तर काय होईल? हेच आपण समजून घेऊया.
मुळात भारतात सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत फार जुनी आहे. आयुर्वेदात कोमट पिणं एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. ज्याने शरीर आतून स्वच्छ तर होतंच, सोबतच वेगवेगळ्या समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, उपाशीपोटी कोमट पाणी प्याल तर शरीराची जठराग्नि म्हणजे पचनासाठी आवश्यक अग्नि सक्रिय होते. रात्रभर शरीर आराम करत असतं, तेव्हा पचन तंत्र सुस्तीच्या स्थितीत जातं. अशात हलक्या कोमट पाण्याने ते पुन्हा सक्रिय होतं. ज्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. तसेच गॅस, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्याही दूर होतात. इतकंच नाही तर कोमट पाण्याने कफ दोषही संतुलित होते.

إرسال تعليق