उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा खळबळजनक संशय अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर सादरीकरण करत या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी विमान भाड्याने देणाऱ्या व्हीएसआर कंपनीसह संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत आणि विशेषतः फ्रान्स, अमेरिका किंवा युकेमधील तज्ज्ञ एजन्सींकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) अनेक प्रश्नही उपस्थित केले, यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील रोहित पवारांच्या संशयावरती प्रतिक्रिया व्यक्त करत याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात...', अजित पवारांच्या विमान अपघातावरील रोहित पवारांच्या शंकेनंतर आता पुन्हा अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
Maharashtra Maza
0

إرسال تعليق