⚡ ब्रेकिंग News

एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

 एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


.


Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला अकोल्यात खिंडार पाडले आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या 4 नगरसेवकांना गळाला लावलं.

Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प


Akola Thackeray Camp Nagarsevak joins Shinde Camp: दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात परत येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाकरे गटाचे अकोल्यातील चार नगरसेवक (Nagarsevak) फोडण्यात आले आहेत. यामुळे अकोल्याच्या (Akola news) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे


नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने अकोल्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्लीला गेले होते. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या चार नगरसेवकांसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिंदे गटात पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील सागर भारुका सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश. आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे फक्त दोन नगरसेवक उरले आहेत. प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये नुकतीच महापौर पदाच्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबावर उमेदवार असलेल्या सुरेखा काळे यांचाही समावेश आहे. ही एकूणच परिस्थिती अकोल्यातील ठाकरे गटाच्या संघटनेसाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे किंवा पक्षाचे अन्य पदाधिकारी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...