देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो मुंबईचा मराठी माणूस आहे, तो देखील हे पाहतो आणि विचार करतो की त्यांनी काय काम केले आहे. मुंबईतील मराठी माणसांना गेल्या 30 वर्षांत उद्धव ठाकरेंनी काय दिले? काहीही दिलेले नाही. उद्धव ठाकरे हे गेल्या 15 वर्षांत स्वतः मुंबईच्या महापालिकेत लक्ष घालत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी त्यांना खुले आव्हान दिले होते.
उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासाबाबत बोलले तर मी 100 रुपये देईन. त्यानंतर मी माझ्या बक्षीसाची रक्कम 3 हजारांपर्यंत वाढवली, तरीही उद्धव ठाकरे मुंबईच्या विकासाबाबत काहीही बोलले नाहीत. इतकेच नाही तर मी त्यांना आणखी एक खुले आव्हान दिले होते की, मुंबईत तुमचा एक आयकॉनिक प्रकल्प दाखवा. पण उद्धव ठाकरे ते देखील सांगू शकले नाही. त्यामुळे लोकांना हे समजते की एवढ्या वर्षांत मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला. तरी ते मुंबईतील मराठी माणसांसाठी फक्त बोलत राहिले, पण एवढ्या मोठ्या महापालिकेवर त्यांची सत्ता असतानाही उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना काहीही दिलं नाही, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठी माणसांना साधं घरही उद्धव ठाकरे देऊ शकले नाही. दुसरीकडे लोकांनी हे पाहिलं की आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करून लोकांना घरे दिली. तेव्हा लोकांच्या लक्षात आले की लोकांसाठी कोण महत्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईतील मराठी माणसांनीही मतदान केलं आणि आम्ही निवडून आलो, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
.png)
إرسال تعليق