⚡ ब्रेकिंग News

भाजपच्या नगरसेवकांनी 'मोदी-मोदी' घोषणेने सभागृह डोक्यावर घेतलं, इकडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी 'चोर है' घोषणा दिल्या, मग भाजपने ट्रम्प कार्डच बाहेर काढलं

मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर बुधवारी भाजपचा महापौर विराजमान झाला. भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawde) यांची बुधवारी अधिकृतरित्या महापौर म्हणून निवड झाली. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आली. मात्र, सत्तारोहणाच्या या पहिल्याच दिवशी भाजप (BJP) आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत (Mumbai Mahangarpalika Election 2026) आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...