या स्पर्धा प्रगती कॉलेज, डोंबिवली येथे झाल्या. या स्पर्धात जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या कुमार सिद्धेशज्ञानेश्वर शेळके या विद्यार्थीने ६५ वजनी गटात भाग घेतला होता. या गटा मधून ८बेस्ट फिजिक्स निवडण्यात आले. तर कुमार सिद्धेश शेळके यांनी ५ वा क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयच्या संचालीका सौ. कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉ.एस.जी. सागर सर उपप्राचार्य प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालय चे क्रीडाशिक्षक सौ. हर्षला विशे मॅडम व क्रिडा प्रशिक्षक बाळाराम चौधरी सर यांनी पण विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याचा सत्कार केला.


إرسال تعليق